ब्रेकफास्ट न्यूज | पेट्रोल आणि डिझेल 13 पैशांनी महागलं

1,967 views · Published 27 September 2018 · 0:49 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

एकीकडे आयात शुल्कानं अनेक वस्तूंचे भाव वाढले असताना आता पेट्रोल डिझेलची शंभरीकडे जोरदार वाटचाल सुरुच आहे. काल एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आता पेट्रोल आणि डिझेल १३ पैशांनी महागलंय. मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर ९० रुपये ३५ पैसे तर डिझेल ७८ रुपये ८२ पैशांवर गेलाय. तेल उत्पादक देशांची संघटना असलेल्या ओपेकनं उत्पादनात वाढ करण्यास नकार दिल्यानं इंधन दरांचा आणखी भडका उडण्याची शक्यता आहे..

More from this channel