नवी दिल्ली : रेल्वेची 90 हजार पदांसाठी भरती, 9 ऑगस्टपासून परीक्षा
3,676 views · Published 23 July 2018 · 0:49 · Indexed 4 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
रेल्वेने सर्वात मोठी नोकरभरतीची तारीख जाहीर केली आहे. जवळपास 90 हजार पदं रेल्वेत भरली जाणार आहेत. त्यासाठी 9 ऑगस्टपासून परीक्षा घेतली जाणार आहे. रेल्वेची ही ऑनलाईन परीक्षा देशातील सर्व महानगरांमध्ये आयोजित केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 26 हजार 502 जागा भरण्यात येणार आहेत. असिस्टंट लोको पायलट आणि तंत्रज्ञ ही पदं पहिल्या टप्प्यात भरण्यात येतील. 26 जुलैपासून कोणाची परीक्षा कोणत्या शहरात आहे याबाबतची माहिती प्रसिद्ध होईल. मात्र परीक्षार्थी आपलं ई-कॉल लेटर परीक्षेपूर्वी चार दिवस आधीच डाऊनलोड करु शकतील. म्हणजेच 9 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या परीक्षेचं ई-कॉल लेटर 5 ऑगस्टपासून डाऊनलोड करता येईल.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!