अमरावती : खा. अडसूळांची तक्रार, आ. रवी राणांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा

1,775 views · Published 30 July 2018 · 0:37 · Indexed 28 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

बडनेराचे आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. रवी राणा यांनी सोशल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप करत, अडसूळ यांनी ही तक्रार दिली होती. 
मुंबई येथील सिटी बँकमध्ये 900 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करुन, रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर खोटे मेसेज प्रसारित केल्याचा आरोप खासदार अडसूळ यांनी केला. त्यामुळे रवी राणांविरोधात आपण 800 कोटीचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं अडसूळ यांनी म्हटलं आहे.

More from this channel