मुंबई | म्हाडाची घरं 25 ते 30 टक्क्यांनी स्वस्त होणार, उदय सामंतांची घोषणा

1,030 views · Published 12 October 2018 · 1:38 · Indexed 30 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

म्हाडाने आपल्या घरांच्या किमती 25 ते 30 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी म्हाडाच्या काही घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेल्याने, म्हाडाच्या लॉटरीला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला होता. त्याच पार्श्वभूमीवर म्हाडाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली आहे. मुंबई विभागासाठी यावर्षी म्हाडाच्या 1094 घरांसाठी लॉटरी निघणार आहे. येत्या दहा दिवसात या लॉटरी प्रक्रियेच्या सर्व तारखा जाहीर होणार आहेत. त्यामुळे म्हाडाच्या घरांची वाट पाहणाऱ्यासाठी खऱ्या अर्थानं आनंदाची बातमी आहे.

More from this channel