सलगच्या सुट्ट्यांमुळे शिर्डी, पंढरपुरात भाविकांची, तर महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी | एबीपी माझा

1,403 views · Published 10 November 2018 · 0:58 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

सलग सुट्टयांमुळे शिर्डीत साई बाबांच्या दर्शनासाठी साईभक्तांनी अलोट गर्दी केली आहे. तर पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांचा तसेच वारकऱ्यांचा मेळा जमला आहे. जशी भाविकांनी शिर्डी पंढरपूरात देवदर्शनासाठी गर्दी केली आहे, त्याचप्रमाणे राज्यातल्या पर्यटनप्रेमींनी सलग सुट्टीचा फायदा घेत राज्यातले सर्वात थंड हवेचे ठिकाण म्हणजेच महाबळेश्वर गाठले आहे. दिवाळीच्या पार्शवभूमीवर साईबाबांना साकडे घालत नवीन ऊर्जा मिळवण्यासाठी लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झालेत. भाविकांच्या गर्दीने शिर्डीतील रस्ते आणि बाजारपेठा गजबजुन गेल्या आहेत. साईदर्शनासाठी भाविकांना दर्शनाच्या रांगेत तासनतास वाट पाहावी लागत आहे. दिवसभरात दिड लाखांहून अधिक भाविक साईसमाधीचे दर्शन घेतील असा अंदाज मंदिर प्रशासनाकडुन व्यक्त करण्यात आला आहे.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel