ब्रेकफास्ट न्यूज | बीएआरसीचे शास्त्रज्ञ भास्कर दत्त यांचा मुलगा बेपत्ता

1,621 views · Published 29 September 2018 · 0:50 · Indexed 19 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नवी मुंबईत राहणारे बीएआरसीचे शास्त्रज्ञ भास्कर दत्त यांचा 17 वर्षीय मुलगा नमन दत्त मागील 5 दिवसांपासून बेपत्ता झालाय. रविवारी रात्री 10 वाजता भास्कर दांपत्य झोपल्यानंतर नमन रात्री साडे दहा वाजता न सांगता घरातून निघाला. रात्री 10 वाजून 54 मिनिटांनी त्याने वाशी स्टेशन वरून सीएसटीला जाणारी ट्रेन पकडली. मागील पाच दिवसांपासून नवी मुंबई पोलीस नमनचा शोध घेताहेत. वाशी ते सीएसटी पर्यंतचे सर्व रेल्वे स्थानकावरील cctv फुटेज चेक करण्यात आलेत. मात्र नमन अद्यापही सापडला नाही. नमन हा स्वतःहून घर सोडून गेलाय, मात्र नमनकडे फारसे पैसेही नाहीत त्यामुळे नमन कुठे गेला असेल याचा शोध पोलीस घेत आहेत. यासोबतच नमनवर अभ्यासाचा ताण होता व्व्यामुके तो डिप्रेशन मध्ये असल्याची देखील माहिती समोर येत आहे.

More from this channel