औरंगाबाद : कचऱ्याचा प्रश्न पुन्हा पेटला, चिखलठाणा भागात गाडीची तोडफोड

305 views · Published 27 June 2018 · 1:26 · Indexed 26 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मागील काही महिन्यांपासून पेटलेला औरंगाबादेतलाकचरा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. आज सकाळी चिखलठाणा भागात ओल्या कचऱ्याची गाडी रिकामी करण्यास गेली असताना तिथल्या ग्रामस्थांनी गाडी अडवली आणि गाडीची तोडफोड केली. शिवाय गाडीतील स्वच्छता निरीक्षक प्रकाश आठवले यांना बेदम मारहाण केली. तर ग्रामस्थांनी बेल्टने मारहाण केल्याचं स्वच्छता निरीक्षक आठवलेंनी म्हटलं आहे. या मारहाणीच्या निषेधार्थ स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे.

More from this channel