'स्टॅच्यू ऑफ युनिटी' भारताचा अभिमान संपूर्ण जग पाहणार | गुजरात | एबीपी माझा

2,158 views · Published 30 October 2018 · 0:48 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

भारताचा अभिमान ठरणाऱ्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पुतळ्याचं उद्या अनावरण होणार आहे. उद्या मोदींच्या हस्ते जगातल्या या सर्वात उंच पुतळ्याचं उदघाटन होईल.  महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी मराठमोळे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकात देसाई यांच्यावर सोपवण्यात आली आहे.  उद्या अनावरण झाल्यानंतर परवापासून म्हणजे १ नोव्हेंबरपासून स्टॅच्यू ऑफ युनिटी सर्वसामान्य लोकांना पाहण्यासाठी खुलं होईल.  संपूर्ण स्टॅच्यू ऑफ युनिटी तुम्हाला पाहायचं असेल तर त्याचा तिकीट दर हा ५०० रुपये इतका असणार आहे.  तुम्ही जर याठिकाणी गेलात तर स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून ३ किलोमीटर लांब अंतरावर तुम्हाला वाहनं पार्क करावी लागतील. तिथून एका बसद्वारे तुम्हाला स्मारकापर्यंत पोहोचवण्याची सुविधा करण्यात येणार आहे.

More from this channel