मुंबई : पाच वर्ष एकही निवडणूक न लढवणाऱ्या पक्षाची नोंदणी रद्द

720 views · Published 7 August 2018 · 0:43 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाच वर्षांत एकही निवडणूक न लढवणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी यासंदर्भात माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाच वर्षांत एकाही जागेवर निवडणूक न लढवणाऱ्या आणि जाहीरनाम्यातील आश्वासन पूर्ततेचा अहवाल मतदारांच्या माहितीसाठी प्रसिद्ध न करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 2004 पासून राज्य निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षांची नोंदणी केली जाते. सध्या ‘राजकीय पक्ष नोंदणी आदेश 2009’ अस्तित्वात आहे. अनेक राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, विचारवंतांनी केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने या आदेशात सुधारणा केल्या आहे.

More from this channel