स्पेशल रिपोर्ट | कल्याण | रिक्षाचालकाची मुजोरी, महिला वाहतूक पोलिसाला फरफटत नेलं!

4,101 views · Published 10 October 2018 · 3:12 · Indexed 24 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

लायसन्स मागणाऱ्या महिला वाहतूक पोलिसाला मुजोर रिक्षाचालकाने अक्षरशः फरपटत नेल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकारानंतर पोलिसांनी या उद्दाम रिक्षाचालकाला बेड्या ठोकल्या आहे. रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस कशी वाढत चालली आहे, याचं आणखी एक उदाहरण कल्याणमध्ये समोर आलं आहेत. ही घटना काल (9 ऑक्टोबर) संध्याकाळची आहे. कल्याणच्या वाहतूक शाखेत काम करणाऱ्या कॉन्स्टेबल आशा गावंडे या काल संध्याकाळी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात वाहतूक नियंत्रणाचं काम करत होत्या. यावेळी नागेश अल्वागिरी हा रिक्षाचालक गणवेश न घालता रिक्षा चालवत असल्याचं दिसल्यानंतर त्यांनी त्याला थांबवून लायसन्स मागितलं. मात्र यावेळी थांबण्याऐवजी नागेश याने रिक्षा भरधाव वेगात कल्याण कोर्टाच्या दिशेनं दामटवली. यावेळी वाहतूक पोलीस आशा गावंडे यांनी मात्र रिक्षा धरुन ठेवत असल्याने त्या रिक्षेसोबत फरपटत गेल्या आणि मोठा गोंधळ उडाला.

More from this channel