मुंबई : नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, उद्धव ठाकरेंचा विरोध कायम
1,367 views · Published 27 June 2018 · 1:05 · Indexed 20 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
नाणार प्रकरणी पेट्रोलिअम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उद्याच्या भेटीचा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फेटाळलाय... विश्वासात न घेता नाणारचे परस्पर करार करता मग भेट कशाला मागता असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली.,. शिवाय नाणार प्रकल्प महाराष्ट्रात होऊच देणार नाही असं म्हणत विरोध कायम ठेवलाय...काल दिल्लीमध्ये पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी २ कंपन्यांसोबत सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यावर शिवसेनेनं तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान आज नाणार प्रकल्पावरुन मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेना आणि भाजपमध्ये खडाजंगी झाली... नाणार प्रकल्पाबाबत झालेल्या कराराविषयी विश्वासात घेतलं नसल्याची तक्रारही त्यांनी केली. दरम्यान उद्या उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य़ांनी सेना मंत्र्य़ांना दिलं आहे.
More from this channel
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल
-
1:57
नवी दिल्ली : सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देणं हा राज्यपालांचा अधिकार : सुप्रीम कोर्ट
-
0:24
Gaon Tithe Majha : Sangli : Sugar factory worker strike : 17:05:2018
-
0:28
712 : हवमानाचा अंदाज : येत्या दोन दिवसात राज्यात पावसाचा अंदाज
-
2:03
घे भरारी : टिप्स : लिंबूपाणी पिण्याचे फायदे