नाशिक | नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्लूचं थैमान, चार दिवसात सहा बळी

894 views · Published 25 September 2018 · 2:42 · Indexed 3 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नाशकात स्वाईन फ्लूने सध्या चांगलच थैमान घातलं आहे. गेल्या चार दिवसात जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या स्वाईन फ्लू कक्षात उपचार घेणाऱ्या 6 जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यातच तब्बल 21 जण स्वाईन फ्लूचे बळी ठरले आहेत. सप्टेंबर महिन्यात तब्बल 21 जणांचा स्वाईन फ्लूने बळी गेल्याने नाशिककरांमध्ये यामुळे घबराट पसरली आहे. स्वाईन फ्लूची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत असून सुस्त आरोग्य यंत्रणा आता खडबडून जागी झाली आहे. आज आरोग्य उपसंचालकांनी विभागातील खाजगी डॉक्टरांसह अन्न व औषध विभाग आणि आरोग्य अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आणि त्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

More from this channel