चंद्रपूर | भद्रावती शहरात भर दिवसा पट्टेरी वाघ शिरला

1,671 views · Published 6 September 2018 · 0:57 · Indexed 23 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती शहरामध्ये भर दिवसा एका वाघाने ठाण मांडल्याने एकच खळबळ उडाली. छत्रपती लेआऊटच्या मोकळ्या जागेत या वाघानं ठाण मांडली होती... शहरात वाघ घुसल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि वाघाला पाहण्यासाठी एकच झुंबड उडाली.
वाघ ज्या ठिकाणी बसला होता. तिथून मुख्य बसस्थान हाकेच्या अंतरावर आहे. जवळच ऑर्डिनन्स फॅक्टरीची वसाहत आहे. त्यामुळे वाघाला जंगलाच्या दिशेने पिटाळणं कठीण झालं होतं. अखेर वनविभागाच्या जेसीबीच्या मदतीने वाघाची घेराबंदी करुन त्याला पिटाळून लावले. पण दिवसभर भद्रावती शहरात भीतीचं वातावरण होतं.

More from this channel