स्पेशल रिपोर्ट | मोदींना सर्वाधिक पसंती, राहुल गांधी दुसऱ्या क्रमांकावर, प्रशांत किशोरांचा सर्वे

2,722 views · Published 4 September 2018 · 4:26 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या I-PAC या संस्थेने केलेल्या ऑनलाईन सर्व्हेचा निकाल जाहीर झाला आहे. इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीच्या या सर्व्हेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील अन्य नेत्यांच्या तुलनेत खूप पुढे आहेत. या सर्व्हेचा निष्कर्ष राजकीय असला, तरी या सर्व्हेत महात्मा गांधीजींच्या 18 सूत्री कार्यक्रमातून देशाला विकासाच्या वाटेवर कोण नेऊ शकेल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यामध्ये 48 टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पसंती दिली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे दुसऱ्या नंबरवर असले, तरी दोघांमधील अंतर हे खूपच आहे. अवघ्या 11 टक्के लोकांना वाटतं की राहुल गांधी हे महात्मा गांधींच्या 18 सूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करु शकतील.

More from this channel