शिर्डी | ऑनलाईन नोंदणीचा गैरवापर, शिर्डीच्या साईबाबांचं विधानसभा मतदार यादीत नाव
1,707 views · Published 28 August 2018 · 0:36 · Indexed 29 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
शिर्डीच्या साईबाबांचं नाव मतदार यादीत समाविष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिर्डीतील मतदार यादीत अवैधरित्या साईबाबांचं नाव नोंदविण्यात आलं आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात राहाता पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाईन प्रणालीचा कशाप्रकारे गैरवापर केला जाऊ शकतो, हे यातून समोर आलं आहे. साईबाबांचं नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी इरो-नेट या ऑनलाईन प्रणालीचा गैरवापर करण्यात आला आहे. 1 जानेवारी रोजी हा सगळा प्रकार उघड झाला होता. कारवाई करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या दिरंगाईमुळे गुन्हा उशिरा दाखल झाला आहे. नायब तहसिलदार एस.एच.म्हस्के यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!