मुंबई | नॉनबँकिंग फायनान्शिअल क्षेत्रात तब्बल अडीच ते तीन लाख नोकऱ्या

1,288 views · Published 27 August 2018 · 0:23 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील वर्षभरात देशाच्या नॉनबँकिंग फायनान्शियल क्षेत्रात तब्बल अडीच ते तीन लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. या क्षेत्राची पस्तीस ते चाळीस टक्के वेगाने वाढ होणार असल्याचा अंदाज आर्थिक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. बँकांसमोर सध्या नॉन परफॉमिंग असेटचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्या आव्हानाचा सामना करत आपली आर्थिक स्थिती सुधारण्यात बँका अडकल्या आहेत. त्यामुळे देशात बँकसेवांपासून दूर असलेला एक मोठा वर्ग स्वत:कडे वळवण्याची संधी नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्यांना मिळाली आहे. ही संधी साधण्यासाठी त्यांना नव्या तंत्रज्ञानाचे मजबूत पाठबळही आहे. अडीच ते तीन लाख नोकऱ्यांपैकी बहुसंख्य या सेल्स कलेक्शन, अंडररायटिंग आणि रिस्क या विभागांमध्ये उपलब्ध होणार आहेत. या क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये पुढील 12 महिन्यात तब्बल 35 ते 40 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.

More from this channel