712 :चीनमध्ये भारतीय कापसाची मागणी वाढली

749 views · Published 22 June 2018 · 0:48 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

भारतीय कापसाला जागतीक बाजारात मागणी वाढत आहे. त्यातही सगळ्यात जास्त मागणी चीनमध्ये असणार आहे. यामागे अनेक कारणं सांगीतली जात आहे. चीनचा कमी झालेला कापसाचा साठा, २०१३-१४ सालापासून खालावलेलं कापसाचं उत्पादन ही यातलीच काही कारणं आहेत. मात्र आता यात आणखी एक कारण जोडलं गेलं आहे. अमेरीका आणि चीनमधील व्यापारी युद्धाचा फायदा भारतीय कापसाला होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. चीननं अमेरीकेहून आयात केल्या जाणाऱ्या कापसावरील आयातशुल्कात २५ टक्क्यांनी वाढ केली आहे. ज्यामुळे भारतीय कापसाची चीनमधील निर्यात वाढण्याची चिन्ह आहेत.

More from this channel