मुंबई | रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

1,387 views · Published 18 August 2018 · 0:46 · Indexed 24 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या म्हणजेच रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे दरम्यान सकाळी 11.20 ते दुपारी 4. 20 पर्यंत हा ब्लॉक असेल. या काळात धिम्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंडनंतर या लोकल पुन्हा धिम्या मार्गावर धावतील. 
तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या काळात कुर्ला ते वाशी ही सेवा पूर्णपणे बंद असेल.या काळात सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल या दरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येतील..
पश्चिम मार्गावर अंधेरी ते बोरिवली दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येतोय. दुपारी 4.20 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. या काळात बोरीवली ते अंधेरी दरम्यानच्या जलद फेऱ्या धिम्या मार्गावरुन वळवण्यात येतील.

More from this channel