नवी दिल्ली | भाजप नेते मधू देवळेकरांकडून वाजपेयींच्या आठवणींना उजाळा

492 views · Published 17 August 2018 · 14:07 · Indexed 27 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

माजी पंतप्रधान, प्रतिभासंपन्न कवी, प्रेरणादाई वक्ता, संवेदनशील व्यक्तिमत्व अशी एकपेक्षा एक बिरुदावली घेऊन जगणाऱ्या अटल पर्वाचा अंत झाला आहे. एम्स रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने काल संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित करण्यात आला. आज दुपारी 4 वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या निमित्ताने ज्येष्ठ भाजप नेते मधू देवळेकर यांनी वाजपेयींच्या आठवणींना उजाळा दिला.

More from this channel