सलग पाचव्यांदा मोदींची जवानांसोबत सीमेवर दिवाळी | डेहरादून | एबीपी माझा
1,737 views · Published 7 November 2018 · 2:08 · Indexed 16 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग पाचव्या वर्षी भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली. आज केदारनाथला जाण्यापूर्वी मोदी उत्तराखंडमधील हर्षील येथील भारत-चीन सीमेवर दाखल झाले. तिथल्या आयटीबीपी (ITBP) जवानांसोबत त्यांनी दिवाळी साजरी केली. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदी दरवर्षी जवानांसोबत दिवळी साजरी करतात. नरेंद्र मोदी यांनी 2014 साली पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा 2014 साली सियाचिन येथे भारत-चीन सीमेवर तैनात असलेल्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. त्यानंतर 2015 साली त्यांनी पंजाब सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. 2016 साली मोदी हिमाचल प्रदेश येथील सीमा भागात गेले. तिथल्या तिबेट सीमेवर त्यांनी पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली. मागील वर्षी त्यांनी जम्मू-काश्मिरमधील गुरेज येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!