मुंबई : बीपीसीएल पेट्रोलियम प्लान्टमध्ये स्फोट, काय आहे बीपीसीएल कंपनी?

4,721 views · Published 8 August 2018 · 2:21 · Indexed 28 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

चेंबूर- वडाळ्याजवळ भारत पेट्रोलियम रिफायनरीमधील (बीपीसीएल) हायड्रोक्रॅकर प्लान्टमध्ये स्फोट झाला. त्यामुळे माहुलगाव परिसर हादरलं. या स्फोटामुळे आग लागली आणि परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं आहे. धक्कादायक म्हणजे या प्लान्टमध्ये शेकडो कामगार अडकल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी काही कर्मचारी जखमी झाले आहेत. स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की दूरपर्यंत तो ऐकायला गेला. बीपीसीएल रिफायनरीच्या बॉयलरमध्ये दुपारी 2 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास स्फोट झाला. स्फोटानंतर आग आणि धुराचे लोट पसरले. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या 15 पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. वडाळ्याजवळ मोठे पेट्रोकेमिकल प्लान्ट आहेत. त्यामुळे हा परिसर अतिशय संवेदनशील आहे. दुसरीकडे या परिसरात मोठी झोपडपट्टी आहे. तिथे हजारो लोक राहतात. त्यामुळे इथे पेट्रोकेमिकल प्लान्टची आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

More from this channel