मुंबई | मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातील वादग्रस्त कविता वगळली

2,331 views · Published 29 September 2018 · 0:48 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबई विद्यापीठाच्या बीए तृतीय वर्षाच्या मराठी विषय पेपर क्रमांक सहा मधील पाणी कसं असतं ही कविता अखेर अभ्यासक्रमातून वगळण्यात आली आहे.  या कवितेत पाण्याला वेगवेगळ्या उपमा देताना आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातील असे काही शब्द वापरण्यात आहेत, असा आरोप आदिवासी समाज आणि काही विद्यार्थ्यी संघटनांनी केला होता. त्यामुळे ही कविता अभ्यासक्रमात वगळण्याची मागणी करण्यात आली होती. विद्यापीठानं बोर्ड ऑफ स्टडीज यांची बैठक बोलावून ही कविता अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय घेतलाय. कवी दिनकर मनावर यांच्या दृश्य नसलेल्या दृश्यात या कविता संग्रहातून ही कविता अभ्यासक्रमात घेण्यात आली होती.

More from this channel