नागपूर | पापणी लवण्यापूर्वी चोरी, पापणी उघडेपर्यंत चोर पकडला!
4,795 views · Published 8 October 2018 · 1:23 · Indexed 14 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
सराईत चोरट्याने पापणी लवण्यापूर्वी चोरी केली, पण त्यापेक्षा दोन पावलं पुढे असलेल्या पोलिसांनी, अवघ्या 26 सेकंदात चोर पकडण्याची कमाल केली. अतिशयोक्ती वाटावी अशी घटना नागपुरात घडली. नागपूर रेल्वे स्टेशनवरील इंटिग्रेटेड सीसीटीव्ही सर्व्हिलन्स सिस्टिममुळे काही सेकंदातच आरपीएफच्या जाळ्यात अडकला आहे. शनिवारी संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास सुनील राय नावाचा शातीर चोर दाखल झाला आणि इकडे तिकडे फिरू लागला. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या जवानांनी त्याला इंटिग्रेटेड सीसीटीव्ही सर्व्हिलन्स सिस्टमवर पाहताच त्याच्यावर नजर ठेवणे सुरु केले. थोडावेळ इकडे तिकडे घुटमळल्यानंतर, सुनील राय एका झोपलेल्या प्रवाशाच्या बाजूला जाऊन बसला. त्यानंतर त्याने मोठ्या शिताफीने झोपलेल्या प्रवाशाच्या पॅंटच्या मागच्या खिशातून त्याचं पाकीट काढलं आणि तिथून निघून गेला. त्यानंतर त्याला रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या जवानाने येऊन पकडले. 5 वाजून 35 मिनिटं आणि 14 सेकंदाला पर्स काढणारा सुनील 5 वाजून 35 मिनिटं आणि 40 व्या सेकंदाला आरपीएफ जवानांच्या तावडीत सापडला. मी काहीच केले नाही असा आक्रोश चोरट्याने केला. मात्र, जेव्हा आरपीएफने त्याला सीसीटीव्ही दाखवला, तेव्हा मात्र त्यानं गुन्हा कबुल केला
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!