जम्मू-काश्मीर | कुलगाम जिल्ह्यात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

1,700 views · Published 15 September 2018 · 1:39 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील चौगाममध्ये सुरक्षा दलाने पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. या भागात आणखी काही दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे. सध्या दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरु आहे. 
जम्मू काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार, चौगम भागात दहशतवाद्यांसोबत चकमक जारी आहे. या दहशतवाद्यांना मारणं ही पोलिसांची मोठी कामगिरी आहे. कारण, मारलेल्या दहशतवाद्यांमध्ये लश्कर आणि हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

More from this channel