मुंबई | बेजबाबदारपणे वाहन चालवत चिमुकल्याच्या अंगावर गाडी घालणाऱ्या महिलेवर गुन्हा
3,006 views · Published 26 September 2018 · 3:17 · Indexed 28 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
कारखाली येऊनही आश्चर्यकारकरित्या बचावलेल्या मुलाचा शोध लागला आहे. निष्काळजीपणे गाडी चालवणाऱ्या महिलेची माहितीही 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहे. मुंबईतील दिंडोशी भागात राहणाऱ्या श्रद्धा चंद्राकर यांचा निष्काळजीपणा चिमुरड्याच्या जीवावर बेतला असता. श्रद्धा चंद्राकर आणि गाडीखाली आलेला मुलगा गोरेगावमधील दिंडोशी भागातल्या सद्गुरु कॉम्प्लेक्समध्ये राहतात. गाडी बाहेर काढताना चंद्राकर यांनी केलेल्या हलगर्जीमुळे चिमुरडा गाडीखाली आला होता. 24 तारखेला संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी पालकांना विचारणा केल्यानंतर आता श्रद्धा चंद्राकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटर वाहन कायद्यातील कलम 337 आणि 134 नुसार बेदरकारपणे गाडी चालवणे आणि पोलिसांपासून अपघाताची माहिती लपवून ठेवणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा अजामीनपात्र असल्याने आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:58
मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं