मुंबई : खड्ड्यात कमळ ठेवून काँग्रेसचं अनोखं आंदोलन
1,015 views · Published 12 July 2018 · 2:57 · Indexed 24 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
किती सरकार आले,.. किती गेले.. पण मुंबईकरांच्या पाचवीला पुजलेल्या खड्ड्यांवर कुणालाच इलाज सापडत नाहीए. सुप्रीम कोर्टानं झापलं... हायकोर्टानं फटकारलं मात्र खड्डे जैसे थेच... आता मुंबईकरही खड्ड्यांच्या नावानं बोंब मारुन थकलेत... पण हे सगळं इथंच थांबत नाही... कारण मुंबईतल्या खड्ड्यांची परिस्थिती दिवसेंदिवस अतिशय भयानक होतेय.. मुंबईतल्या खड्ड्यांकडे पालिका आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसनं रस्त्यावर बसून अनोखं आंदोलन केलं... मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्त्वाखाली खड्डे पडलेले रस्ते बुजवून त्यावर भाजपचा निषेध म्हणून कमल लावले.. शिवाय किर्तन, भजन करत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला...घाटकोपरमधील खड्ड्यांभोवती रांगोळी काढून खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी जास्त खड्डे पडलेल्या चौकांना विश्वनाथ महाडेश्वर चौक असे नामकरण करणारे फलक लावले होते. घाटकोपर परिसरातील भटवाडी, पारशीवाडी, रेल्वे स्थानक परिसर, असल्फा या परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. दरम्यान मुंबई आणि दिल्लीतल्या खड्ड्यांवरून सुप्रीम कोर्टानंही केंद्र सरकारला झापलं.. आणि खड्ड्यांची माहित कोर्टात सादर करण्याचे आदेश दिलेत...
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!