पुणे | दहीहंडीला वर्गणी न दिल्याचा राग, पुण्यात दुचाकी जाळली!
4,283 views · Published 2 September 2018 · 0:39 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पुण्यात दहीहंडीच्या सणाला गालबोट लागलंय. दोन दिवसांपूर्वी दहीहंडीच्या बॅनर लावण्यावरुन अक्षय घडसी या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली, तर काल दहीहंडीची वर्गणी दिली नाही म्हणून चार जणांनी दुचाकी जाळल्याची धक्कादायक घटना घडलीय. दहीहंडी म्हणजे तरुणांचा आवडता सण. कित्येक दिवस आधीपासून तरुणवर्गाची लगबग पाहायला मिळते. कुठे वर्गणी गोळा करणे, तर कुठे दहीहंडीचे बॅनर लावणे. पुण्यात मात्र या आनंदाला गालबोट लागलंय. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील सिंहगड रोडवरील माणिकबाग परिसरात अक्षय घडसी या तरुणाची परिसरातील पाच-सहा तरुणांनी धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. हत्येच्या या घटनेला एक दिवस उलटत नाही, तोच पुण्यातील आंबेगाव येथे दहीहंडीची वर्गणी न दिल्यामुळे एका सोसायटीमध्ये मित्राच्याच दुचाकीला आग लावण्यात आलीय. वर्गणी न दिल्याचा राग मनात धरुन चार जणांनी दुचाकीवर पेट्रोल टाकून पेटवून दिली.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!