जळगाव पालिका निवडणूक : जळगाव महापालिकेचा अंतिम निकाल

3,313 views · Published 3 August 2018 · 0:42 · Indexed 29 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राज्यात मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, बेरोजगारी आदी मुद्द्यांवरुन भाजपविरोधी वातावरण तयार झालं असताना, जळगाव महापालिका निवडणुकीचे धक्कादायक निकाल हाती आले आहेत. जळगाव महापालिकेत भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवत सुरेश जैन यांची सद्दी संपवल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव महापालिकेत तब्बल 40 वर्षानंतर जळगाव महापालिकेतील सुरेश जैन गटाचं वर्चस्व संपलं आहे. भाजपने जळगाव महापालिकेच्या 75 पैकी 57 जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेला 15 आणि एमआयएमला 3 जागा मिळवता आल्या. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. एकनाथ खडसेंच्या बालेकिल्लात गिरीश महाजनांची जादू चालली आहे. पण वर्षभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी महापालिका कर्जमुक्त करण्याचं आणि जळगाव स्वच्छ सुंदर करण्याचं आव्हानही गिरीश महाजन यांना पेलावं लागेल.

More from this channel