ब्रेकफास्ट न्यूज | 'बंच ऑफ थॉट्स'मधील विचार सध्याच्या घडीला संयुक्तिक नाहीत : सरसंघचालक

577 views · Published 20 September 2018 · 1:45 · Indexed 30 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा ज्यांच्या मार्गदर्शनानं पुढे गेली त्या डॉ. गोळवलकर लिखित 'बंच ऑफ थॉट्स' या पुस्तकापासून संघानं पहिल्यांदाच स्वतःला दूर केलं आहे. त्या पुस्तकातले संदर्भ तत्कालीन होते. ते विचार आता संयुक्तिक नाहीत, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले आहेत. अस्पृश्यतेचं समर्थनासह अनेक गोष्टी या 'बंच ऑफ थॉट्स' या पुस्तकात आहेत. मात्र आतापर्यंत संघाकडून कुणीही थेटपणे याबाबत भाष्य केलेलं नव्हतं. काल दिल्लीत ते बोलत होते. तीन दिवसांपासून दिल्लीत संघानं व्याख्यानमालेचं आयोजन केलं होतं. काल त्याचा शेवटचा दिवस होता.

More from this channel