भारतीय सैन्याच्या ताफ्यात दोन शक्तीशाली तोफा दाखल | स्पेशल रिपोर्ट | नाशिक | एबीपी माझा

3,938 views · Published 9 November 2018 · 3:22 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सामर्थ्यशाली भारतीय सैन्यदलाची ताकद आता अजून वाढणार आहे. भारताच्या शत्रूंविरोधात लढण्यासाठी सैन्याच्या ताफ्यात आता दोन नव्या महाकाय तोफा दाखल होणार आहेत. एम 777 अल्ट्रालाईट होवित्झर आणि के. 9 वज्र या दोन अत्याधुनिक परदेशी तोफा भारतीय सैन्याला मिळणार आहेत. भारतीय सैन्यदलाच्या नाशिकमधील देवळाली येथील प्रशिक्षण केंद्रात या तोफा लवकरच दाखल होतील. देवळाली येथील तोफखाना केंद्रात एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांच्या उपस्थितीत या तोफांचे हस्तांतरण केले जाणार आहे. त्यासाठी देवळाली येथे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

More from this channel