मुंबई : मुख्यमंत्र्यांकडून 1767 कोटींची जमीन 3 कोटीत बिल्डरला, काँग्रेसचा आरोप

4,654 views · Published 2 July 2018 · 3:38 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

काँग्रेसनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आतापर्यंतचा सर्वात मोठा आरोप केलाय. नवी मुंबईत सिडकोच्या २४ एकर जागेबाबत मोठा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसनं केलाय. सीडकोच्या ताब्यातील या जागेची किंमत तब्बल १ हजार ७६७ कोटी रुपये असताना, ती फक्त साडे तीन कोटी रुपयांत बिल्ड़र मनिष भतिजा आणि संजय भालेराव यांना विकण्यात आल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. हे बिल्डर भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रसाद लाड यांचे जवळचे मित्र आहेत. इतकच नाही तर ते भागिदारही असण्याची शक्यता काँग्रेसनं व्यक्त केलीय.

More from this channel