ब्रेकफास्ट न्यूज | मुंबई शहरात तब्बल 26 हजार 934 खड्डे असल्याचा दावा
467 views · Published 29 August 2018 · 0:54 · Indexed 12 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबई शहरात 26 हजार 934 इतके रेकॉर्डब्रेक खड्डे पडल्याचा दावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस नवीन लादे यांनी केलाय. आणि या खड्ड्यांची नोंद गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मात्र खड्डेयुक्त शहर किंवा रस्त्यांच्या आधीच्या रेकॉर्डची नोंद नसल्याने त्यात अडचणी येत आहेत. नवीन लादे यांच्या टीमनं शहरातील नागरिकांकडून खड्ड्यांचे फोटो मागवले. त्यानंतर ते सेंट्रल डाटाबेसवर अपलोड केले. एकच खड्डा पुन्हा पुन्हा नोंदीत येऊ नये यासाठी जिओ टॅगिंग करण्यात आलं. हा सगळा मजकूर मुंबईपॉटहोल्स डॉट कॉमवर उपलब्ध आहे. हा सगळा कारभार तब्बल 38 दिवस सुरु होता. आणि त्यावर तब्बल 4 लाख रुपये खर्च झालाय. आता खड्डा दाखवा आणि हजार रुपये मिळवा, किंवा मुंबईत खड्डेच नाहीत, असा दावा करणाऱ्यांची पोलखोल करण्यासाठी एवढं पुरेसं आहे
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!