मुंबई : मराठवाडा वगळता राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाची हजेरी

1,510 views · Published 7 July 2018 · 1:07 · Indexed 22 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबई, कोकण, नागपूरसह विदर्भातील अनेक भागात सध्या जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. शुक्रवारी रात्रीपासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. महाड, पोलादपूर, कर्जत आणि माथेरान परिसरात दमदार पाऊस झालाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, कणकवलीमध्ये मुसळधार पाऊस झालाय. तिलारी आणि कर्ली नदीला पूर आलाय. त्यामुळे ग्रामिण भागातील जनजीवन विस्कळीत झालंय. तर मुंबई आणि उपनगरातही रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. वसई विरारसह मिरा भाईंदरमध्ये पावसानं दमदार हजेरी लावलीय.  तिकडे नागपुरातही कालपासून सुरु असलेला पाऊस अद्यापही बरसत आहे. तसंच पुढील तीन दिवस विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. राज्यात अन्यत्र पाऊस बरसत असताना मराठवाड्यावर मात्र पाऊस रुसल्याचं पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील काही भागात फक्त हलका पाऊस बरसल्याचं पाहायला मिळालं.

More from this channel