मुंबई : सुधन्वा गोंधळेकरचा शिवप्रतिष्ठानशी सध्या संबंध नाही - नितीन चौगुले
1,638 views · Published 10 August 2018 · 0:47 · Indexed 27 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
महाराष्ट्रातल्या चार महत्त्वाच्या शहरांमध्ये घातपाताचा कट दहशतवादविरोधी पक्षाने उधळून लावला आहे. आज नालासोपाऱ्यात हिंदू जनजागृतीच्या तीन सदस्यांच्या अटकेच्या कारवाईनंतर एटीएसने ही माहिती कोर्टात दिली आहे. पुणे, सोलापूर, सातारा आणि नालासोपाऱ्यात घातपात घडवण्याचा या तिघांचा डाव असल्याचा दावा एटीएसने केला आहे. गुरुवारी रात्री नालासोपाऱ्यात एटीएसनं कारवाई करत भांडार आळीतल्या घरातून तब्बल 20 देशी बॉम्ब आणि 50 बॉम्ब बनवण्याचं सामान हस्तगत केलं. शिवाय त्याच घरातून वैभव राऊत याला अटक केली. वैभवच्या चौकशीनंतर शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना एटीएसनं अटक केली. आज कोर्टात आरोपींना हजर केल्यानंतर महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा डाव असल्याचं समोर आलं. मुंबई सत्र न्यायालयातील न्यायमूर्ती समीर अडकर यांच्या विशेष न्यायालयात वैभव राऊतसह शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना हजर करण्यात आले. वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या तिघांनाही 18 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!