पणजी : गोव्यात 'सांजाव' उत्सव उत्साहात साजरा
1,564 views · Published 24 June 2018 · 1:17 · Indexed 20 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
गोव्यात काल सांजाव हा ख्रिस्ती बांधवांचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. संत जॉन बाप्तिस्ता यांचा जन्मदिवस गोव्यात सांजाव म्हणून साजरा केला जातो. संत जॉन यांच्या नावाचा अपभ्रंश सांजाव असा होतो. मान्सून सुरु झाल्यानंतर गोव्यातील ख्रिस्ती बांधवाचा हा पहिलाच सण असतो. डोक्यावर काटेरी मुकुट, गळ्यात घुमट आणि फुलांच्या माळा, हातात माडाच्या झाडाच्या फांद्या आणि वाद्यांचा गजर करत ख्रिस्ती बांधव या दिवशी गटागटानं फिरतात. यावेळी विहीरी आणि तलावात उड्या मारत ख्रिस्ती बांधवांनी मौजमस्ती केली. डोक्यावर सजवल्या गेलेल्या चक्रांना कॉपेल असं म्हटलं जातं. यावेळी निसर्गाचं जतन करण्याचा संदेशही दिला गेला.
More from this channel
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल
-
1:57
नवी दिल्ली : सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देणं हा राज्यपालांचा अधिकार : सुप्रीम कोर्ट
-
0:24
Gaon Tithe Majha : Sangli : Sugar factory worker strike : 17:05:2018
-
0:28
712 : हवमानाचा अंदाज : येत्या दोन दिवसात राज्यात पावसाचा अंदाज
-
2:03
घे भरारी : टिप्स : लिंबूपाणी पिण्याचे फायदे