अंधेरी पूल दुर्घटना : दुर्घटनेवरुन शिवसेना-भाजपमध्ये जुंपली

1,004 views · Published 3 July 2018 · 3:23 · Indexed 23 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईची लाईफलाईन असलेली पश्चिम रेल्वे तब्बल साडेबारा तासानंतर हळूहळू पूर्वपदावर येत आहे.. अंधेरीहून चर्चगेटहून विरारच्या दिशेने पहिली लोकल धावली आहे. अंधेरी स्टेशनवरुन पार्ल्याला जोडणारा गोखले पादचारी पुलाचा भाग आज सकाळी साडेसातच्या दरम्यान कोसळला. या घटनेत ५ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रेल्वेनं दिलीय. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही लोकल ही पुलाखाली नव्हती, अन्यथा मोठ्या दुर्घटनेला सामोरं जावं लागलं असतं.. याआधी 29 सप्टेबर 2017 ला एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या दुर्घटनेतही 23 जणांना जीव गमवावा लागला होता. 
यानंतर मुंबईतील फूट ओव्हर ब्रीज, जिने आणि इतर सुविधा अद्ययावत करण्यावर भर देऊ असं आश्वासन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिलं होतं. मात्र बोलबच्चनगिरीशिवाय मुंबईकरांच्या हाताला काहीही लागलेलं नाही.

More from this channel