छत्रपती शिवाजी स्टेडियम खेळासाठी की पार्किंगसाठी | स्पेशल रिपोर्ट | कोल्हापूर | एबीपी माझा

1,866 views · Published 13 November 2018 · 3:21 · Indexed 2 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

कुस्ती, कबड्डी आणि नेमबाजी या खेळांइतकंच कोल्हापूरकरांचं फुटबॉलवरही अमाप प्रेम आहे. महाराष्ट्रातली फुटबॉलची पंढरी म्हणून कोल्हापूरची ओळख आता रुढ झाली आहे. पण सणासुदीच्या काळात कोल्हापुरातल्या वाढत्या वाहनांची समस्या इथल्या फुटबॉलच्या मुळावर येऊ पाहात आहे. नवरात्रौत्सव आणि दिवाळीच्या निमित्त कोल्हापुरात आलेल्या पर्यटकांसाठी छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळं मैदानाची दुरवस्था झाली असून, त्याचा फटका राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेला बसू शकतो.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel