पुणे | व्यभिचार कायदा रद्द करण्याच्या निर्णयाचा अन्वयार्थ काय? अॅड. असीम सरोदे यांच्याशी बातचित

1,375 views · Published 27 September 2018 · 1:23 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

#Section497 #Adultery

व्यभिचाराला गुन्हा ठरवणारं 158 वर्षे  जुनं कलम 497 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला.  स्त्री-पुरुष यांच्या विवाहबाह्य संबंधातील व्यभिचार कायद्यासंदर्भात भारतीय दंड विधान कलम 497बाबत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. पती हा पत्नीचा मालक नाही.  स्त्री-पुरुषांना समान अधिकार आहे. महिलांचा सन्मान होणं गरजेचं आहे. विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नाही, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला.
व्यभिचारासाठी कायद्यात केवळ पुरुषांनाच शिक्षेची तरतूद होती. याचिकाकर्त्याने हा कायदा घटनाबाह्य असल्याची मागणी केली होती. हा कायदा 158 वर्षे जुना होता. सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांचं घटनापीठ यावर निर्णय घेतला. या घटनापीठामध्ये न्यायमूर्ती आर. एफ. नरिमन, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा आणि न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांचा समावेश होता.
घटनापीठ व्यभिचार हा गुन्हा आहे की नाही हे आज ठरवणार होतं. या प्रकरणात न्यायालयानं 8 ऑगस्टला निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर व्यभिचार हा गुन्हा नाही, हे कोर्टाने जाहीर केलं.

More from this channel