ब्रेकफास्ट न्यूज | देशातली पहिली ग्रीन प्लेट कार खरेदी करणाऱ्या अविनाश निमोणकर यांच्याशी खास गप्पा

1,832 views · Published 24 October 2018 · 11:56 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर, गाड्यांच्या अतिवापरामुळे होणारं प्रदुषण यातुन मार्ग कसा काढायचा यासाठी सतत नवनविन उपाय शोधले जातात. काहींना चांगला प्रतिसाद मिळतो तर काही उपायांना अजिबातच नाही. इंधनाचा कमीतकमी वापर आणि प्रदुषण रोखण्यासाठी आता देशात इलेक्ट्रीक कारचा पर्याय पुढे येतोय. नागपूरप्रमाणे ठाण्यातही महिंद्राची इलेक्टिक गाडी दाखल झालीए. या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी शून्य प्रदुषण करत असल्यानं हीची नंबर प्लेट हिरव्या रंगाची आहे.
ठाण्याच्या अविनाश निमोणकर यांनी या गाडीची खरेदी केलीए. ही गाडी एकदा चार्ज केली की ती १५० किलोमीटर पर्यंत सहज धावते. इतकंच नाही तर सरकारी अनुदानामुळे या गाडीची किंमत चार ते पाच लाखांनी कमी झालीए. 
यागाडीची काही प्रमुख वैशिष्ट्यं म्हणजे ही गाडी पर्यावरण पूरक आहे, या गाडीला धूर बाहेर सोडणारा पाईपही नाही. घरच्या घरी ८ ते १० तास चार्जिंग केल्यावर गाडी दीडशे किलोमीटर चालते. या गाडीची मेंटेनन्स कॉस्ट खूपच कमी आहे. या गाडीला रोड टॅक्स आणि नोंदणी शुल्कातूनही सूट देण्यात आलीये. उतारावर ही गाडी चालवताना आणि ब्रेक मारल्यावर ही गाडी चार्ज होते. तर सिग्नल वर असताना बॅटरीचा वापर होत नाही त्यामुळे चार्जिंग लगेचच संपत नाही. 
ही गाडी आपल्या घरी आणलेले ठाण्याचे रहिवासी अविनाश निमोणकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी या गाडीबद्दल अधिक बोलुया

More from this channel