मुंबई | लता मंगेशकरांचं 28 सप्टेंबरला नव्वदीत पदार्पण

1,118 views · Published 20 September 2018 · 0:40 · Indexed 19 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गाणसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर येत्या 28 सप्टेंबर रोजी नव्वदीत पदार्पणकरत आहे. यानिमित्त लता मंगेशकर यांच्या जीवनावर आधारित 'मोठी तिची सावली' पुस्तकाची घोषणा करण्यात आलीय. लतादीदींच्या भगिनी मीना मंगेशकर-खडीकर हे पुस्तक लिहणार आहे. या पुस्तकासाठी हृदयेश आर्ट्स आणि 'स्वरगंधार'चं सह्योग लाभणार आहे. 
प्रभुकुंज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर-खडीकर, प्रकाशक आप्पा परचुरे आणि हृदयेश आर्ट्सचे अध्यक्ष अविनाश प्रभावळकर उपस्थित होते.

More from this channel