ठाणे | राजस्थानमध्ये दोघांचं अपहरण करणाऱ्या सहा जणांना अटक
1,285 views · Published 10 September 2018 · 0:53 · Indexed 26 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
राजस्थानमधील उदयपूरमध्ये फायनान्स कंपनीच्या दोघा संचालकांचे अपहरण करून 1 कोटीची खंडणी मागणाऱ्या 6 जणांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली. या टोळीच्या तावडीतून दोघा संचालकांची सुटका करण्यात आली असून त्यांच्याकडून पाच तलवारी आणि एक गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. देवानंद वरंदानी आणि रोनक सैनी या दोघा व्यापाऱ्यांची श्री तिरुपती निधी लिमिटेड नावाची कंपनी आहे. ही कंपनी प्रॉपर्टी गहाण ठेवून कर्ज देते. या कंपनीचा नंबर मिळवून आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि दोघा संचालकांना आपण बांधकाम व्यवसायिक असल्याचे भासवले. तसेच आपणास बांधकामासाठी मोठे कर्ज हवे असल्याचे सांगून दोघांना ठाण्यात प्रॉपर्टी दाखवण्यासाठी बोलावले. हे दोघे संचालक 7 सप्टेंबर रोजी ठाण्यात आले असता त्यांचे ठाणे स्थानकासमोरील अशोक टॉकीज येथून अपहरण केले होते.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया