खेळ माझा | आशिया चषक | हॉंगकाँगवर मात करत भारताची विजयी सलामी
1,774 views · Published 19 September 2018 · 4:37 · Indexed 10 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
टीम इंडियानं हाँगकाँगवर 26 धावांनी मात करून, आशिया चषकात विजयी सलामी दिली. या विजयासाठी हाँगकाँगनं भारतीय संघाला संघर्ष करायला लावला. या सामन्यात भारतानं हाँगकाँगला विजयासाठी 286 धावांचं कठीण आव्हान दिलं होतं. पण हाँगकाँगच्या नजाकत खान आणि अंशुमन रथनं 34 षटकांत 174 सलामी देऊन, भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. अखेर कुलदीप यादवनं रथला आणि खलिल अहमदनं नजाकतला लागोपाठच्या षटकात माघारी धाडून सामन्याला कलाटणी दिली. त्यानंतर हाँगकाँगला 50 षटकांत आठ बाद 259 धावांचीच मजल मारता आली. भारताकडून खलील अहमदनं वन डे पदार्पणात तीन विकेट्स काढून सामना गाजवला. यजुवेंद्र चहलनं तीन, तर कुलदीप यादवनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!