ब्रेकफास्ट न्यूज : उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटी, जनजीवन विस्कळीत

775 views · Published 6 August 2018 · 0:38 · Indexed 28 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

उत्तराखंडमधल्या चमोलीमध्ये ढगफुटी झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. राजधानी डेहराडूनमध्ये पावसानं धुमाकूळ घातल्यानं घराघरांमध्ये कंबरे एवढं पाणी साचलंय. त्यामुळे राजधानी डेहराडून ठप्प झालीय. शाळेच्या वसतीगृहात पाणी शिरल्यानं शेकडो विद्यार्थी आणि शिक्षक अडकलेत. त्यामुळे अक्षरशा प्रशासनाकडून सौंग नदीचा प्रवाह वळवण्याचा प्रयत्न केला जातोय. तर बद्रीनाथ महामार्गावर भूस्खलन झालंय. कावड यात्रेसाठी निघालेल्या यात्रेकरुंवर झाड कोसळल्यानं एकाचा मृत्यू झाला..तर एक यात्रेकरू गंभीर जखमी झालाय. या नैसर्गिक आपत्तीमध्ये पाळीव जनावरांनाही आपला जीव गमवावा लागलाय.

More from this channel