ब्रेकफास्ट न्यूज | पुणे शहराचा पाणीपुरवठा आज पूर्ण बंद

568 views · Published 30 August 2018 · 0:31 · Indexed 25 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुणे शहरात आज पाणीपुरवठा बंद असणार आहे. शहरातील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी-वारजे, नवीन होळकर या जलकेंद्रांतील  पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशनमधील देखभाल-दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत. त्यामुळे संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा आज बंद असेल. तर, या कामामुळे शहरातल्या बहुतांश भागात उद्या उशिरा तर कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे.

More from this channel