गणेश विसर्जन | नागपूर | बाप्पाच्या मिरवणुकीसाठी डीजेला फाटा, पारंपरिक वाद्यांना पसंती

543 views · Published 23 September 2018 · 2:12 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

गणपती ही खरं तर बुद्धीची देवता... पण बहुदा 11 दिवसांच्या मुक्कामातही पुण्यातल्या मंडळांना बाप्पा बुद्धी देऊ शकले नाहीत... पण दुसरीकडे मुंबईतल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना मात्र बाप्पा पावल्याचं दिसतंय... 
ही अशी तुलना करण्याचं कारण म्हणजे... न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही... पुण्यात मात्र डीजेचा दणदणाट यंदाही कायम राहिला... त्यामुळे आता प्रश्न असा आहे... की मुंबईतल्या मोठमोठ्या मंडळांनी जी सजगता... जो समजुतदारपणा दाखवला... तो पुण्यातल्या अतिउत्साही मंडळांनी का दाखवला नाही... 
यंदा मुंबई उच्च न्यायालयाने आणि राज्यसरकारने डीजेचा दणदणाटावर बंदी घातलेली असतानाही, पुण्यातल्या काही आडमुठ्या मंडळांनी आपलं तुणतुणं डीजेसह वाजवलंच... 
मंडळातल्या कार्यकर्त्यांसोबत पोलिसांच्या बाबतीतही मुंबई पोलीस हे पुणे पोलिसांवर सरस ठरले आहेत... कारण डीजे वाजवणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचं सोडून पुणे पोलीस फक्त पंचनामे करत बसले आहेत... या उलट मुंबई पोलिसांनी कुठेही डीजे वाजणार नाही... याची खबरदारी घेतल्याचं दिसतंय...

More from this channel