मुंबई : टाटा विद्युत प्रकल्पाचं पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळवणार

1,591 views · Published 2 August 2018 · 3:27 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

टाटा विद्युत प्रकल्पासाठी दिला जाणारा पाणी पुरवठा दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातल्या सहा धरणातून दिला जाणारा पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येईल. निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची, यासाठी नऊ सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. सध्या टाटा विद्युत प्रकल्पाला लोणावळा, वलवण, शिरवटा, सोमवाडी, ठोकरवाडी आणि मुळशी या सहा धरणातून पाणीपुरवठा होतो. तुटीच्या भीमा खोऱ्यातील हे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्याचा निर्णय घेण्यात आला. या पाण्याचा पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यासाठी फायदा होईल.

More from this channel