नवी दिल्ली : जीएसटीतील 12 आणि 18 टक्क्यांचा स्लॅब रद्द होण्याची शक्यता

1,673 views · Published 4 August 2018 · 2:40 · Indexed 19 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) यामध्ये केंद्र सरकार एकीकडे 28 टक्क्यांचा टॅक्स स्लॅब रद्द करण्याचा विचार करत आहे. तर दुसरीकडे 12 आणि 18 टक्क्यांचा टॅक्स स्लॅब रद्द करुन याचा एकच 14 टक्क्यांचा स्लॅब करण्याचा विचार करत आहे. शनिवारच्या बैठकीत याबाबत निर्णय होऊ शकतो. जीएसटीच्या फिटमेंट कमिटीचे प्रमुख आणि बिहारचे अर्थमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या मते, आता जीएसटीमध्ये 12 आणि 18 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबला एकत्र करण्यावर काम सुरु आहे. याबाबतीत राज्यांसोबत चर्चाही केली जात आहे. 12 आणि 18 टक्क्यांचा एकच 14 टक्के असा स्लॅब बनवला जाऊ शकतो.

More from this channel