मुंबई | चौकशी सुरु असलेल्या 42 हॉटेल्सच्या फाईल्स गायब

765 views · Published 5 October 2018 · 0:39 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

कमला मील दुर्घटनेनंतर चौकशीच्या घेऱ्यात आलेल्या 42 हॉटेल्सच्या फाईल्स महापालिकेकडून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.. अंधेरी, जुहू, विलेपार्लेमधील अनेक पंचतारांकीत हॉटेल्सचा यामध्ये समावेश आहे. महापालिकेच्या के वेस्ट वार्ड ऑफिसमधून फाईल गायब झाल्याची तक्रार डीएन नगर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे. 
कमला मील दुर्घटनेनंतर अनेक अनाधिकृत हॉटेल्सवर कारवाई केली जात होती. त्या प्रकरणाच्या चौकशीच्या या सर्व फाईल्स होत्या. ज्यामध्ये हॉटेल्सच्या परवानग्या, खातेपत्रकासह अनेक महत्त्वाची माहिती असल्याचं कळतंय. त्यामुळं या फाईल गायब झाल्या की केल्या गेल्या? याबाबत आता प्रश्नचिन्हं उभं राहतंय.
त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी केली जातेय..

More from this channel