नागपूर: पावसाच्या पाण्याने विधीमंडळ परिसरात दारुच्या बाटल्यांचा खच
2,548 views · Published 6 July 2018 · 3:36 · Indexed 12 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
नागपूरमधील मुसळधार पावसाचा फटका विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनालाही बसला आहे. महाराष्ट्राच्या विधीमंडळात वीजपुरवठा खंडित केल्याने इतिहासात पहिल्यांदाच वीज गेल्याने विधीमंडळाचं कामकाज ठप्प झालं आहे. परंतु विधीमंडळाबाहेर पाणी साचण्यामागचं प्रमुख कारण आता समोर आलं आहे. विधानभवन परिसरात पाण्याचा निचरा होणाऱ्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बाटल्यांचा खच साचला होता. सुरुवातीला नाला काठोकाठ भरलेला होता. त्यामधूनच पाण्याचा निचरा होत होता. परंतु गटाराचं पुढचं झाकणं उघडलं असता पाणी साचण्याचं कारण समोर आलं. इथे दारुच्या बाटल्या तसंच प्लास्टिकच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच होता. कर्मचाऱ्यांनी या बाटल्या आणि पिशव्या बाजूला केल्यानंतर पाण्याचा निचरा व्हायला सुरुवात झाली.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!