नाशिक| 62 हजार इमातींनी आतापर्यंत कोणताही कर भरलाच नाही

785 views · Published 7 September 2018 · 1:11 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नाशिक शहरातील 62 हजार इमातींनी आतापर्यंत कोणताही कर भरलेला नाही. ही धक्कादायक बाब महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या सर्व्हेत उघड झाली आहे. त्यामुळे बिल्डरांनी नागरिकांची फसवणूक केल्याचं यातून स्पष्ट झालंय. महत्वाची बाब म्हणजे अद्याप ही गोष्ट महापालिकेच्या लक्षात कशी आली नाही, हा प्रश्न आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करुन बिल्डर आणि अधिकारी यांचे काही लागेबांधे आहेत का, याची चौकशी केली जाणार आहे. तसंच कर चुकवलेल्या 62 हजार इमारतींकडून आताच्या करप्रणालीप्रमाणे थकबाकी दंडासहित वसूल करण्यात येईल असं स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांनी स्पष्ट केलंय.

More from this channel